सोलापूर – हनीट्रॅपमध्ये अडकलेले भारतीय जनता पक्षाचे सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर भाजपाचे अध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे देण्यात आला आहे.
श्रीकांत देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकविल्याची तक्रार मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर मंगळवारी देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. अखेर श्रीकांत देशमुख यांनी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
एका महिलेने आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकविले असून तिच्याकडून 2 कोटी रुपये आणि मुंबईमध्ये घर देण्याची मागणी करण्यात आली असल्याची तक्रार श्रीकांत देशमुख यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर मंगळवारी त्या महिलेने श्रीकांत देशमुख यांच्या सोबतचा बेडरूममधील व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल केला होता.
या महिलेने मोबाईलच्या कॅमेरासमोर येऊन देशमुख यांचे नाव घेत आपल्याला विवाहबाह्य संबंध ठेवण्याबाबतचा खुलासा केला आहे. संबंधित महिला कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग करत असल्याचे दिसताच श्रीकांत देशमुख हे बेडवरून उठले आणि त्यांनी मोबाईलमधील चित्रीकरण बंद केल्याचे दिसले आहे. त्यानंतर संबंधित महिला आणि श्रीकांत देशमुख यांच्यात खडाजंगी होत असल्याचे ऑडिओमधून दिसून येत आहे.
शिवसेनेचा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा…
श्रीकांत देशमुख हे भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत. आक्रमक आंदोलनासाठी ते प्रसिद्ध आहेत. काही वर्षांपूर्वी याच श्रीकांत देशमुख यांनी सांगोला तालुक्यात स्वतःवर गोळीबार करून आपल्यावर फायरिंग झाल्याचा बनाव केला होता. हे प्रकरण देशमुख यांच्या चांगले अंगाशी आले होते.
अग्निपथ योजनेच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान याचिका