वडूज (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीसपदी विकल्प शहा यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आमदार जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, भरत (आप्पा) घनवट, नंदकुमार गोडसे, अनिल अण्णा गोडसे, आप्पासाहेब गोडसे, वडूज शहराध्यक्ष प्रदीप शेटे, नगरसेवक अनिल माळी, जयवंत पाटील, विनायक खाडे, सुधीर गोडसे, काकासाहेब बनसोडे, प्रदीप खुडे, गणेशशेठ गोडसे, श्रीकांत काळे, निलेश कर्पे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
विकल्प शहा यांनी यापूर्वी भाजप खटाव तालुकाध्यक्ष म्हणून पक्षवाढीसाठी प्रयत्न केला होता. त्याच्या कार्याची दखल घेत पक्षाने या पदावर काम करण्याची संधी दिली आहे. या संधीचा फायदा समाजातील सर्व घटकांना करुन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले.