…म्हणून रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल युजर्सने दिला हा सल्ला

मुंबई – पश्चिम बंगालमधील राणावत रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचा आवाजातील गाणे गाणारी रानू मंडलचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. रानू मंडलच्या या व्हिडीओने तिला एका रात्रीत सुपरस्टार बनविले. रानू मंडल यांच्या ‘तेरी मेरी कहानी…’ या गाण्याने सामाजिक माध्यमांमध्ये चांगलीच पसंती मिळविली होती. मात्र सध्या त्यांच्यावर सामाजिक माध्यमांमधून ट्रोलिंग सुरु आहे. कधी उद्धट बोलण्यावरून तर कधी फॅन्सला दिलेल्या प्रतिसादवरून ट्रोल केले गेले तर आता तिच्या न्यू लुकमुळे चांगलेच ट्रोल केले जात आहे.

सध्या याच रानूचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. होय, रानूचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत रानूने हेवी मेकअप केला आहे. सध्या तिच्या या नव्या लुकमुळे तिला युजर्सने तिला चांगलेच सल्ले दिले आहे. तसेच रानूने कॅरी केलेला नवा लुक रूचला अनेक युजर्सला नाही. मग काय लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केले. सध्या रानूच्या या नव्या लूकवरचे मीम्स व्हायरल होत आहेत. यात युजर्स रानूची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

तत्पूर्वी, सोशल माध्यमांवरील एका व्हिडिओनुसार पत्रकारांनी  रानूची प्रशंसा करत, तिला प्रश्न विचारते. स्वप्न पूर्ण होतात. तुला इतके मोठे यश मिळाले, काय तुला विश्वास बसतो? असा प्रश्न रिपोर्टर रानूला करते. पण या प्रश्नाकडे पूर्णत: दुर्लक्ष करत रानू तिच्या बॅगेतून काहीतरी काढते आणि खाते. यानंतरही आपले जणू लक्षच नाही, अशा तो-यात ती रिपोर्टरकडे दुर्लक्ष करते. रिपोर्टर दुस-यांदा तिला प्रश्न विचारते. हा व्हिडीओ समोर येताच, रानूवर प्रचंड टीका होत आहे.

तर काही दिवसांपूर्वी एका चाहतीला फटकारतानाचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.  रानू मंडल दिसताच एक चाहती रानू जवळ येते आणि हात लावून बोलण्याचा प्रयत्न करते, असे या व्हिडीओत दिसले होते. पण चाहतीचे अशा प्रकारे हात लावणे रानूला अजिबात आवडत नाही. त्यामुळे ती रागात ‘डोन्ट टच मी, आय एम सेलिब्रेटी नाऊ’ असे म्हणते. या व्हिडीओनंतरही रानू ट्रोल झाली होती. स्टारडम मिळाल्यामुळे रानू मंडलच्या डोक्यात हवा गेल्याची प्रतिक्रिया अनेकांनी त्यावेळी दिली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)