पीएमसी बॅंक घोटाळा: पहिल्यांदाच उघड झाले राजकीय कनेक्‍शन

भाजपच्या माजी आमदाराच्या मुलास अटक

मुंबई : देशातील बॅंकांचे घोटाळे काही केल्या कमी होत नाहीत. त्यातच नुकताच उघडकीस आलेला पीएमसी बॅंकेचा घोटाळा त्यात आता राजकीय कनेक्‍शन उघडकीस आले आहे. पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी मोठा मासा गळाला लागला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सरदार तारासिंग यांचा मुलगा आणि या घोटाळ्यातील संशयित रणजित सिंग याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेने शनिवारी अटक केली.


रणजित सिंगच्या अटकेमुळे अनेक गोष्टी समोर येण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. रणजित सिंग हे बॅंकेच्या कर्जवसुली समितीवर होते. दरम्यान, आता पीएमसी बॅंकेतून खातेदारांना 50 हजार रुपये काढता येणार आहेत. आर्थिक गैरव्यवहारांमुळे रिझर्व्ह बॅंकेने पीएमसी बॅंकेतील व्यवहारांवर निर्बंध घातले. पण या निर्बंधांनंतर अनेक खातेदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यापार्श्वभूमीवर टप्याटप्याने रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवत नेली आहे.

तत्पूर्वी, एचडीआयएल ग्रुपचे राकेश व सारंग वाधवान, बॅंकेचे माजी चेअरमन वरयाम सिंग, माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांचा समावेश आहे. पीएमसी बॅंकेतील 4 हजार 355 कोटींचा कर्ज घोटाळा उघड झाल्यानंतर या सर्वांना अटक करण्यात आली आहे. देशातील पहिल्या दहा सहकारी बॅंकांमध्ये समावेश असणाऱ्या पंजाब आणि महाराष्ट्र बॅंकेत झालेल्या प्रचंड घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. बॅंकेच्या व्यवस्थापनाने एनपीए आणि कर्जवितरणासंबंधी चुकीची माहिती रिझर्व्ह बॅंकेस सादर केली होती. यानंतर घोटाळा उघडकीस आला होता. मात्र, यामुळे बॅंकेतील ठेवीदार मोठे अडचणीत आले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)