पुणे – करोनाची कोणतीही लक्षणे नसल्यास हॉटेल कर्मचाऱ्याची करोना चाचणी करून घेणे बंधनकारक नाही, असे स्पष्टीकरण पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले.
मात्र, ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी आदी लक्षणे आढळल्यास संबंधित हॉटेल कर्मचाऱ्याची अँटीजेन किंवा स्वॅब चाचणी करणे आवश्यक आहे, असेही कुमार यांनी नमूद केले.
दरम्यान, राज्य शासन तसेच महापालिकेने हॉटेलांसंदर्भात काढलेल्या मार्गदर्शक तत्त्वांबाबतच्या आदेशात चाचणी करणे बंधनकारक आहे, असे कुठेही नमूद केलेले नाही.
तरीदेखील प्रशासनाकडून हॉटेल व्यावसायिकांना धाब्यावर धरले जात असून चाचणी करून घ्या, असे फर्मान सोडले जात असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे.