नवी दिल्ली – अरबी समुद्रामध्ये हौथी बंडखोरांकडून व्यापारी मालवाहतूक करणार्या जहाजांवरील हल्ले वाढल्यामुळे आता पाकिस्ताननेही अरबी समुद्रातील गस्त वाढवली आहे. अरबी समुद्रात अलीकडेच झालेल्या सागरी सुरक्षेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सागरी गस्तीसाठी पाकिस्तानच्या गस्त नौका आणि टेहळणी जहाजे तैनात केली आहेत, असे पाकिस्तानच्या नौदलाने सांगितले.
सोमालियाच्या किनार्याजवळ जहाजाचे अपहरण झाल्याच्या वृत्तानंतर भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने बहरीनला जाणार्या बल्क कॅरिअरला रोखल्यानंतर गस्तीबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानकडे जाणारी आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजे ज्या सागरी मार्गाने जातात, तेथे दोन ते तीन जहाजे नेहमी त्या भागात गस्त घालत असतात. याशिवाय, आमच्या सागरी क्षेत्रातून जाणार्या आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांची सुरक्षा जपण्यासाठी व्यापक हवाई पाळत ठेवली जात आहे, असेही पाकिस्तानच्या नौदलाने म्हटले आहे.