– ऋषिकेश जंगम
मुंबई – बॉलिवूड कलाकार अनेकदा त्यांच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे सतत चर्चेत असतात. त्यांच्या आलिशान जीवनशैली विषयी प्रेक्षकांना कमालीचं आकर्षण असत. तसेच आपल्या लाडक्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला मिळणारं मानधन किती?
याबद्दल सुद्धा फॅन्स आवडीने जाणून घेतात. मात्र, या कलाकारांना चित्रपटा व्यतीकरिक्त लग्नात डान्स करण्यासाठी किंवा हजेरी लावण्यासाठी किती कोटींचं मानधन मिळतं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सलमान खान –
या यादीची सुरुवात आपण बॉलिवूडचा भाई जान अर्थातच अभिनेता ‘सलमान खान’ पासून सुरुवात करणार आहोत. अभिनेता सलमान खानची एक झलक दिसावी यासाठी अनेक जण कसोशीने प्रयत्न करत असतात. कोट्यवधींचा मालक असलेला सलमान खान लग्नामध्ये परफॉर्म करण्यासाठी साधारणपणे २ कोटी रुपये मानधन घेतो.
शाहरुख खान –
बॉलिवूडचा किंग खानदेखील अनेक बड्या कलाकार, राजकीय व्यक्ती वा अन्य सेलेब्सच्या लग्नात डान्स परफॉर्म करतो. अभिनेता शाहरुख काही मिनिटांचा डान्स करण्यासाठी तब्बल ३ कोटी रुपये इतके मानधन घेतो.
कतरिना कैफ –
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिने अलिकडेच विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली आहे. कतरिनादेखील अनेक लग्न समारंभामध्ये डान्स परफॉर्म करते. यासाठी ती ३.५ कोटी रुपये मानधन घेते.
अक्षय कुमार –
खिलाडी अक्षय कुमार पार्टी किंवा लग्नात सहसा दिसत नाही. परंतु लग्नात हजेरी लावण्यासाठी अक्षय २.५ कोटी रुपये इतक्या मानधनाची मागणी करतो.
अभिनेत्री प्रियंका चोप्रा –
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आज हॉलिवूडमध्येदेखील नशीब आजमावत आहे. त्यामुळे तिची लोकप्रियता आता सातासमुद्रापारपर्यंत पोहोचली आहे. प्रियांका एका डान्स परफॉर्मसाठी २.५ कोटी रुपये घेते.
रणबीर कपूर –
या यादीत अभिनेता रणबीर कपूर देखील मागे नाहीए. लग्न सोहळ्यात डान्स करण्यासाठी तो २ कोटींची फी घेत असल्याचं म्हटलं जातं.