Emraan Hashmi On Nepotism| अभिनेत्री कंगना राणावत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने इंडस्ट्रीतील नेपोटीजमवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती. यामुळे तिच्यावर टीकाही झाली. अनेक बॉलीवूड कलाकारांनी देखील तिच्यावर टीका केली होती. यानंतर आता बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी याने कंगनाला सडेतोड उत्तर देत घराणेशाहीच्या मुद्दयावर उघडपणे भाष्य केले आहे.
एका मुलाखतीदरम्यान इमरान म्हणाला की, “मी कंगनाबरोबर ‘गँगस्टर’सारखा सुपरहीट चित्रपट केला आहे, त्यात माझी नकारात्मक भूमिका होती आणि कंगना मुख्य भूमिकेत होती. मला एक माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून कंगना फार आवडते. चित्रपटसृष्टीत कदाचित तिला काही वाईट अनुभव आले असतील. पण या इंडस्ट्रीबद्दल कंगनाचं मत कधी बदललं. तिने सर्वांना नशेच्या अधीन असल्याचा दावा का केला किंवा आक्रमक का झाली? याबद्दल मलाही काहीच माहित नाही. ही फार बालिश गोष्ट असून यात काहीच तथ्य नाही.”
बाहेरच्या लोकांसाठी चित्रपटांमध्ये… Emraan Hashmi On Nepotism|
इम्रान पुढे म्हणाले की, ‘कोविड आणि सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर इंडस्ट्रीत घराणेशाहीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मी स्वतः चित्रपटाच्या बॅकग्राऊंडमधून आलो आहे आणि मला विश्वास आहे की चित्रपटांमध्ये प्रवेश करणे आमच्यासाठी थोडे सोपे आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की सर्वकाही आपल्याला दिले जाते. मला मान्य आहे की बाहेरच्या लोकांसाठी चित्रपटांमध्ये प्रवेश करणे खूप कठीण आहे. हे मी स्वतः पाहिले आहे. चित्रपटात कलाकार होणे तर दूरची गोष्ट आहे, फक्त दिग्दर्शकाशी बोलणे ही मोठी गोष्ट आहे.’
इम्रानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो अलीकडेच सलमान खानच्या ‘टायगर 3’ मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता तो लवकरच त्याच्या ‘शो टाईम’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. मिहीर देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली ही सिरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. Emraan Hashmi On Nepotism|
हेही वाचा:
आयकर विभागाने करदात्यांना दिली शेवटची संधी ; ‘या’ तारखेपर्यंत आयटीआर भरण्याच्या सूचना
Chandrakant Patil| “देशात लोकसभा नावाचे लग्न, त्यासाठी…” चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली भूमिका