लंडन – टाटा समूह ब्रिटनमध्ये तब्बल 42 हजार 500 कोटी रुपये गुंतवणुकीचा इलेक्ट्रिक बॅटरी प्रकल्प उभारणार आहे. त्या बॅटऱ्या जग्वार लॅंड रोव्हरबरोबरच इतर कंपन्यांनाही पुरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
हा युरोपातील सर्वात मोठ्या कारखान्यापैकी एक कारखाना असेल असे टाटा समूहाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या प्रकल्पाला ब्रिटन सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले गेले असण्याची शक्यता आहे. मात्र टाटा समूह किंवा ब्रिटिश सरकारने यावर कसलेही वक्तव्य केलेले नाही.
या प्रकल्पातील उत्पादन 2026 मध्ये सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भातील तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.