नवी दिल्ली : काँग्रेस आणि भाजपा नेत्यांमध्ये शाब्दिक वाद हे काही नवीन नाहीत. दोन्ही पक्षातील नेते रोज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळतात. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजा पटेरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा’ असा सल्लाच देऊन टाकला. समोर आलेल्या व्हिडीओतील माहितीनुसार, रविवारी काँग्रेस नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमातील त्यांचा व्हिडीओ सध्या सोशलमीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
‘पीएम मोदी की हत्या करने के लिए तत्पर रहें’
काँग्रेस नेते राजा पटेरिया यांचा कार्यकर्त्यांना सल्ला; नवा वाद निर्माण होण्याची शक्यता pic.twitter.com/hMZoygn0jC
— Shivraj Yadav | शिवराज यादव 🇮🇳🖊️ (@shiva_shivraj) December 12, 2022
काँग्रेस नेते राजा पटेरिया यांनी या बैठकीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
“नरेंद्र मोदी निवडणूक संपवतील; धर्म, जात, भाषेच्या आधारे सर्वाचं विभाजन करतील. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांना धोका आहे. जर आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहिलं पाहिजे,” असं ते म्हणाले. दरम्यान यानंतर त्यांनी हत्या म्हणजे पराभव असं सांगत सावरण्याचाही प्रयत्न केला.