मुंबई : दरभंगाला जाणाऱ्या पवन एक्सप्रेसच्या चाकातून धूर येऊ लागल्याने घबराट पसरली. हा प्रकार कल्याण आणि टिटवाळास्थानका दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास घडला.
पॉवर जनरेटर व्हॅनच्या या दोन्ही स्थानकात सुमारे 10 ते 15 मिनिटे थांबली. मध्ये रेल्वेचे मुख्य प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी ही माहिती दिली. ब्रेक जाम झाल्याने ही व्हॅन थांबल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. त्यावेळी या व्हॅन भोवती धूर जमा झाला. त्यामुळे प्रवाशांत घबराट निर्माण झाली. मात्र रेल्वे प्रशासनाने अशा गोष्टी क्वचित घडतात. त्यात घाबरण्यासारखे काही नसते. प्रवाशांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले.
कल्याण स्थानकात येताना आणि टिटवाळा स्थानक सोडताना दोनदा या गोष्टी घडल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांनी हा बिघाड तात्काळ दुरूस्त केला. त्यानंतर पवन एक्सेप्र्रेस दरभंगाकडे रवाना झाली.