Fire in Chhatrapati Sambhajinagar| छत्रपती संभाजीनगर शहरात बुधवारी सकाळी कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. यात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. छावणी भागात ही घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या अग्नितांडवात 2 पुरुष, 3 महिला आणि 2 मुलांचा गुदमरून मृत्यू झाला.
जैन मंदिराच्या शेजारी असणाऱ्या दुमजली घरात ही आग लागली. आगीमुळे धुराचे प्रचंड लोट छावणी परिसरात निर्माण झाले होते. आग लागलेल्या इमारतीत एकूण 16 जण राहात होते. पहिल्या मजल्यावर 7 लोक होते. तर दुसऱ्या मजल्यावर 7 लोक होते आणि तिसऱ्या मजल्यावर 2 लोक होते. यामध्ये दुसऱ्या मजल्यावरील सर्व सात लोकांचा मृत्यू झाला आहे.
आगीची माहिती समजताच घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यानंतर अग्नीशमन दलाने आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले असून घटनास्थळी पोलिस आयुक्तांनी पाहणी केली आहे.
आगीमागचे कारण अद्याप अस्पष्ट Fire in Chhatrapati Sambhajinagar|
आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर पाच जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. आगीत संपूर्ण कुटुंबातील लोकांचा मृत्यू झाला आहे. पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली, त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची खासदार इम्तियाज जलील यांनी पाहणी केली. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. कोणाच्या चुकीमुळे 7 लोकांचे मृत्यू झाले याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा: