श्रीगोंदा आगाराकडून स्मार्ट कार्डचे वाटप

श्रीगोंदा – बसचे सर्व सवलतीची कागदी पास आता स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरित करण्यात येत आहे. या सर्व स्मार्टकार्डची नोंदणी सुरू असून, श्रीगोंदा आगारातील सेंटरवरून आत्तापर्यंत पत्रकार कार्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार कार्ड, वितरीत केले गेले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांचे पहिले कार्ड जे काही दिवसांपूर्वी कंपनीकडे नोंद केले होते. ते सर्वात प्रथम ज्येष्ठ नागरिक इंगळे यांना देण्यात आले. सर्व ज्येष्ठ नागरिकांना लवकरात लवकर आपल्या कार्डची नोंदणी करण्याचे आवाहन श्रीगोंदा अगाराकडून करण्यात आले आहे.

हे कार्ड इंगळे यांना सुपूर्द करताना श्रीगोंदा आगारचे कंट्रोलर दिगंबर दरेकर, ट्रायमॅक्‍सचे इंजिनिअर अमर घोडके उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.