शासनाची प्रत्येक योजना गरजूंपर्यंत पोचवू ; आ. कोल्हे

कोपरगाव -दिव्यांगांसाठी असणाऱ्या शासनाच्या प्रत्येक योजना त्यांच्यापर्यंत पोचवून ऑनलाइन प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्‍यक ते सर्व सहकार्य करू, असे प्रतिपादन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्‍यातील शंभर दिव्यांग बांधवांना जिल्हा रुग्णालयात नेऊन आवश्‍यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांचे ऑनलाईन प्रमाणपत्र काढण्यात आले. या प्रमाणपत्रांच्या वाटपप्रसंगी आ. कोल्हे बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात होते. प्रारंभी दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकुंद काळे, मुख्तार पठाण यांनी प्रास्तविक केले. शहराध्यक्ष कैलास खैरे यांनी ऑनलाईन प्रमाणपत्राची माहिती सांगितली. भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे, नगरसेविका भारतीताई वायखिंडे, हर्षा कांबळे, रेखाताई काले, सुवर्णा सोनवणे, शिल्पाताई रोहमारे, स्वप्नील कडू, संजय इजगे, सुनीता चोरगे, नलिनी अमृतकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. कोल्हे म्हणाल्या, दिव्यांगांच्या समस्या अनंत आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी स्वतंत्र कक्ष स्थापन करून शंभर बांधवांना नगर येथे नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. तसेच आवश्‍यक ती कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवून दिले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात दिव्यांगांसाठी विशेष कॅम्प घेण्यात येणार आहे. सूत्रसंचालन माजी नगरसेवक जयवंत मरसाळे, पंडित पंडोरे, प्रभाकर वाणी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.