Radhika Apte : अभिनेत्री राधिका आपटेने (Radhika Apte) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मुंबई विमानतळावर आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. राधिका आपटे गेले काही तास एअरपोर्टवर अडकली आहे. त्याबाबत तिने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.
राधिका आपटे हिने इंस्टाग्रामवर मुंबई एअरपोर्टवरील व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. ज्यात लोकांना बंद केल्याचे दिसत तर राधिका फ्लाइटची वाट पाहत खाली बसलेली दिसत आहे. यावेळी तिने तोंडावर मास्क लावलेला आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले की, मला हे पोस्ट करावे लागले! आज सकाळी साडेआठ वाजता माझी फ्लाइट होती. आता 10 :50 वाजले आहेत आणि फ्लाइट अजूनही आलेली नाही. पण फ्लाइटच्या क्रुने सांगितले की आम्ही बोर्डिंग करत आहोत आणि सर्व प्रवाशांना एरोब्रिजमध्ये बसवले आणि लॉक केले आहे.’
View this post on Instagram
पुढे तिने म्हटले की, ‘लहान बाळ, वृद्धांसह प्रवासी तासाभरापासून कोंडून आहेत. सुरक्षा दरवाजे उघडणार नाही. कर्मचार्यांनाही पूर्णपणे माहिती नाही. त्यांचा क्रूदेखील आत आलेला नाही. क्रूमध्ये बदल झाला होता आणि ते अजूनही नवीन क्रूची वाट पाहत आहेत परंतु ते कधी येतील याची त्यांना कल्पना नाही. त्यामुळे किती काळ आत लॉक ठेवले जाईल हे कोणालाही माहिती नाही.’
शेवटी ती म्हणाली, ‘बाहेरील अत्यंत मूर्ख कर्मचारी महिलेशी बोलण्यासाठी मी पळून जाण्यात यशस्वी झाले. पण ती काही अडचण येणार नाही आणि उशीर होत नाही असे सांगत होती. आता मी आत बंद आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही दुपारी 12 वाजेपर्यंत येथे असे बंद असू. तोपर्यंत पाणी नाही, बाथरुमची सोय नाही. मजेदार प्रवासाबद्दल धन्यवाद!! द’रम्यान, राधिकाच्या या पोस्टनंतर मुंबई एअरपोर्टवरील या ढसाळ कारभारावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.