Radhika Apte New Look| अभिनेत्री राधिका आपटेने अनेक चित्रपटांमध्ये उत्तम काम करत स्वत: ची ओळख निर्माण केली आहे. तिच्या हॉट आणि बोल्ड लुकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. मात्र सध्या राधिकाचा सोशल मिडियावरील एक फोटो पाहून सर्वचजण चकीत झाले आहे. या फोटोमध्ये राधिका नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे.
राधिका आपटे हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती रागात दिसते आहे आणि तिच्या नाकावर पट्टी बांधलेली दिसत आहे. तिने एका हाताने केसवर पकडलेले दिसत आहेत. तिचा हा फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत. तिची अशी अवस्था का झाली, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
राधिका हिने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये तिच्या आगामी सिनेमाचा फर्स्टलूक असल्याचं सांगितलं आहे. ‘ती इकडेच आहे… जगात स्वागत उमा…, कान्स डायरेक्टर्स फोर्टनाईटला जाण्यापूर्वी सिस्टर मिडनाईटचा पहिला लूक…’ सांगायचं झालं तर, राधिकाचा फोटो ‘सिस्टर मिडनाईट’ सिनेमातील आहे. महत्त्वाचं म्हणजे सिनेमाला कान्स फेस्टिव्हलमध्ये स्थान मिळाले आहे.
View this post on Instagram
‘सिस्टर मिडनाईट’ सिनेमाचं दिग्दर्शक करण कंधारी आहेत. या सिनेमात राधिका आपटे हिच्यासोबत अभिनेता अशोक पाठक मुख्य भूमिकेत असणार आहे. तसेच स्मिता तांबे आणि छाया कदम देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. वेलिंग्टन फिल्म्सच्या ॲलिस्टर क्लार्कने फिल्मगेट फिल्म्स, सीन व्हीलन आणि फिल्म आय व्हॅस्ट यांच्या सहकार्याने याची निर्मिती केली आहे.
राधिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, राधिका ही नुकतीच विजय सेतुपतीचा ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात दिसली होती. तसेच ती ‘शोर इन द सिटी’, ‘पार्च्ड’, ‘बदलापूर’ यांसारख्या सिनेमांमध्येही काम केले आहे. याशिवाय तिने वेब सीरिजमध्ये देखील काम केले आहे.
हेही वाचा:
रणबीर कपूरच्या रामायणमध्ये बालकलाकार कियाराची एन्ट्री