Uddhav Thackeray – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या राम मंदिर अभिषेक सोहळ्याचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे त्यांनी २२ जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती करून हा सोहळा साजरा करण्याचे योजले आहे. या संबंधात उद्धव ठाकरे यांनी सांगितले की होते की ते आणि त्यांचे पक्षाचे नेते नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. आणि त्या दिवशी तेथे महा आरती व पुजा केली जाणार आहे.
तर आज उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदींवर टीका केली ते म्हणाले,’राम मंदिर कुणाची खासगी मालमत्ता नाही. जेव्हा माझ्या मनाला वाटेल तेव्हा रामाच्या दर्शनासाठी मी जाईल अशा शब्दात ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. यावर आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. त्याची ट्विट करत लिहिले आहे की,’उद्धवजी तुम्हाला पक्ष, राज्य सांभाळता आलं नाही, मुख्यमंत्रीपद पेलता आलं नाही’ असं म्हणत वाघ यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.
चित्रा वाघ यांचे ट्विट
उद्धवजी….@uddhavthackeray
पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचे गुरू देवेंद्रजींच्या पाठीशी आहेत. ज्यांनी ३७० कलम हटवलं, राम मंदिर उभारलं, सर्जिकल स्ट्राईक केला, जी२० यशस्वी आयोजिली, महिला आरक्षण दिलं..
या गुरूंनी संपूर्ण जगात भारताचा दबदबा निर्माण केलाय आणि शिष्याने राज्यात असंख्य…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 13, 2024