मुंबई – जागतिक एलपीजी असोसिएशनच्या (डब्लूएलपीजीए) अध्यक्षपदी इंडियन ऑईलचे चेअरमन एस. एम. वैदय यांची निवड करण्यात आली आहे. एलपीजी असोसिएशनचे मुख्यालय पॅरीसमध्ये आहे.
जगभरातील 300हून अधिक वितरण संस्था असोसिएशनच्या सदस्य असून, तब्बल 125 हून अधिक देशांमधे त्या कार्यरत आहेत. एलपीजीची मागणी वाढवून व्यवसायवृद्धी करणे आणि वापराची सुरक्षितता वाढविण्याचे संघटनेचे प्रमुख उद्दीष्ट आहे.
इंडियन ऑईल जागतिक संघटनेची अ श्रेणीची सदस्य असून, (निकष – वार्षिक 700 टीएमटी पेक्षा अधिक एलपीजी विक्री) औद्योगिक परिषदेची सदस्यही आहे.
एस. एम. वैद्य म्हणाले, एलपीजीच्या वाढत्या वापराने जगभरातील लाखो लोकांचे जीवनमान बदलून गेले आहे. ऊर्जा वापरात स्थित्यंतर होत असताना आम्ही या ऊर्जा प्रणालीवर स्वार झालो आहोत. स्वच्छ ऊर्जा देण्यासाठी आमची ही रणनिती महत्वाची ठरेल.
भारतातील ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख म्हणून माझ्या अनुभवाचा फायदा डब्लूएलपीजीचा दृष्टीकोन पुढे नेण्यासाठी करेल. जगाला शाश्वत आणि हरित ऊर्जा देण्यासाठी असोसिएशन महत्त्वाची भूमिका बजावेल.