CNG Price : डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीनंतर एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर आता सीएनजीच्या दरातही (CNG Price) वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्ली एनसीआरमध्ये तीन आठवड्यात दुसऱ्यांदा CNG च्या किंमतीत वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. सीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ झाली आहे.
देशाची राजधानी आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तीन आठवड्यात दुसऱ्यांदा ही वाढ झाली आहे. यापूर्वी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात CNG च्या दरात वाढ करण्यात आली होती. दिल्लीत सीएनजीची किंमत पेट्रोलच्या तुलनेत 20 रुपयांनी कमी आहे. नवीन किंमती आज म्हणजेच 14 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाल्या आहेत.
सीएनजीच्या दरात किलोमागे एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत सीएनजीची किंमत 76.59 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सीएनजीच्या दरात शेवटची घसरण जुलै महिन्यात झाली होती. ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यात सीएनजीच्या दरात वाढ झाली होती.
यापूर्वी ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. 23 नोव्हेंबर 2023 रोजी दिल्ली आणि एनसीआर भागातही सीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या, तर रेवाडीमध्ये किंमती कमी करण्यात आल्या होत्या. त्याआधी ऑगस्ट महिन्यातही सीएनजीच्या दरात वाढ झाली होती. IGL ने ऑगस्टमध्ये वर्षभरात किमतीत दुसरी वाढ केली होती.
23 ऑगस्ट रोजीही दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या किमतीत एक रुपयाने वाढ झाली होती. जुलै महिन्यात महागड्या सीएनजीपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सीएनजीच्या किंमती ठरवण्याच्या मानकांमध्ये बदल केला होता. यानंतर दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये सीएनजीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली.