पुणे – मेट्रो प्रकल्पातील पुनर्वसितांना सदनिका वितरण 4 ते 8 जूनपर्यंत करण्यात येणार असल्याचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी कळवले आहे.
मेट्रो मार्गामुळे कामगार पुतळा आणि राजीव गांधीनगर, शिवाजीनगर येथील झोपडपट्ट्या बाधित होत आहेत. पात्र, झोपडीधारकांना विमाननगर आणि हडपसर येथे निवासी सदनिकांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशीही हे काम सुरू असेल.
सदनिकांचे रजिस्ट्रेशन हे प्रथम उपस्थित राहणाऱ्यास प्राधान्य यानुसार असणार आहे. सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयामध्ये प्रत्येक दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत कार्यालयात 30 सदनिकांचे टोकन पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्यात येईल. मूळ आधारकार्ड आणि हे सूचनापत्र सोबत आणणे आवश्यक आहे.