जोधपुर – राजस्थानातील जोधपुर येथे ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. जोधपूर येथील डांगियावास हायवेवर 17 मीलजवळ रविवारी रात्री साडेअकरा वाजता हा अपघात घडला. अपघातात बोलेरो गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. सुमेर सिंह (वय 21), रावतराम (20), मनोहर (21), जितेंद्र उर्फ चीकू (21), राजेश (22), सिकंदर सिंह (22, सर्व राहणार ब्याबर, अजमेर) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. चंदन सिंह (23) याच्यावर रुग्णालायत उपचार सुरु आहेत.
Rajasthan | Six died in a collision between a truck and car in Dangiyawas area of Jodhpur, late last night: Jodhpur DCP (East) Bhuvan Bhushan Yadav
— ANI (@ANI) July 5, 2021
जोधपुर डीसीपी भुवन भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोलेरो कारमध्ये सात जण प्रवास करत होते. यातील तिघांचा घटनास्थळी तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
जयपुर रोडवर रस्ता दुरूस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे एका बाजुचा रस्ता बंद करण्यात आला असून एकेरी वाहतूक सुरु होती. अशातच ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव बोलेरोची ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात बोलेरो कारचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातानंतर अर्धा तास प्रवासी कारमध्ये अडकले होते. रुग्णवाहिका येण्यासही दोन तास वेळ लागला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे.