मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील गावांबाबत केलेल्या विधानानंतर कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्नाटकात बेळगावला भेट दिली. त्यावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्याच्या टीकेला आता रोहित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
रोहित पवारांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी, “साहेब, किमान सत्यनारायणाचा उल्लेख करताना तरी सत्य बोला, तुम्ही माझे जुने मित्रच आहात,पण नव्या संगतीचा इतका लवकर परिणाम बरा नाही. मराठी अस्मितेशी संबंधित बेळगावविषयी आपणास विस्तृतपणे सांगितले असते, परंतु आपले वक्तव्य ऐकून हा विषय आपल्या आवाक्याबाहेरचा वाटतो, क्षमस्व!” असे म्हटले आहे.
.@samant_uday साहेब, किमान सत्यनारायणाचा उल्लेख करताना तरी सत्य बोला, तुम्ही माझे जुने मित्रच आहात,पण नव्या संगतीचा इतका लवकर परिणाम बरा नाही. मराठी अस्मितेशी संबंधित बेळगावविषयी आपणास विस्तृतपणे सांगितले असते, परंतु आपले वक्तव्य ऐकून हा विषय आपल्या आवाक्याबाहेरचा वाटतो, क्षमस्व!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 14, 2022
दरम्यान, उदय सामंत यांनी रोहित पवारांच्या बेळगाव दौऱ्यावर बोलताना, बेळगावात जात आहे म्हणून सांगायचे आणि सत्यनारायणाच्या पूजेला जायचे कार्यक्रम रोहित पवार करत असल्याची टीका सामंत यांनी केली होती. त्याच टीकेला आता रोहित पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.