पुणे -सिंहगड रस्ता परिसरातील काही भागात प्रत्येक सोमवारी पाणी बंद ठेवण्यात येते. मात्र, सोमवारी शहरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येत असल्याने पाणी पुरवठा सुरू ठेवणार आहे.
प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी व वडगाव परिसरात दिंड्या मुक्कामी असतात. त्यामुळे येथे पाणी सुरू ठेवण्याची मागणी माजी नगरसेविका मंजूषा नागपूरे यांनी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेतल्याचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितले.
या सोमवारी पाणी येणारा भाग
सुदत्त संकुल परिसर, तुकाई नगर परिसर, जाधव नगर परिसर, विश्रांतीनगर परिसर, गोयल गंगा, हिंगणे परिसर, आनंद नगर परिसर, रामनगर, महावीर नगर, सिंहगड रस्ता परिसर, कांडगे पार्क, मोहिते टाऊनशिप परिसर, खोराड वस्ती परिसर, संपूर्ण वडगाव परिसर, वडगाव बुद्रुक, चव्हाण बाग, डीएसके रस्ता, वेंकटेश सेरेनिटी, नांदेड फाटा परिसर, राजयोग सोसायटी, लायगुडे रुग्णालय परिसर, आनंद मंगल कार्यालय, राजयोग सोसायटी परिसर, अभिरूची, समर्थ नगर, दांगट नगर, नारायणबाग, धायरी परिसर, सनसिटी रस्ता परिसर, विठ्ठलवाडी परिसर, ओंकार गार्डन परिसर, अमृत नगर,सावरकर नगर, आंबेगाव बु, शिवसृष्टी परिसर, विकासनगर, घुले नगर, धबाडी, स. नं 45, 48 आणि 47 तसेच निवृत्तीनगर, विष्णू पुरम आणि परिसर.