पुणे-राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना एकात्मिक पद्धतीने चार भागांत पुस्तके वाटप होणार आहेत. सर्व विषयांचा एकत्र समावेश असलेले एक पुस्तक तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी असेल. पाठ्यपुस्तकांतच वह्यांची पानेही दिलेली आहेत.
शाळांना 15 जूनपासून सुरुवात होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकाचे वाटप होणार आहे. यंदापासून विद्यार्थ्यांना नव्या रचनेत पुस्तके उपलब्ध झालेली आहेत. विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या तीन-तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमाची विभागणी करण्यात आली आहे. यानुसार वर्षभरासाठी एकूण 4 पुस्तके आहेत. त्यानुसार पुस्तकांची छपाई करण्यात आली आहे. खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी बाजारातही पुस्तके उपलब्ध केली आहेत.
पहिल्याच दिवशी पुस्तके
बालभारतीकडून पुणे महापालिकेलाही पुस्तकांचे वाटप करण्यात आले. विभागनिहाय केंद्रावरून शाळांना पुस्तकांचे वाटप सुरू आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना समारंभफुर्वक पुस्कांचे वाटप करण्यासह अन्य महत्वाच्या सूचना पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत, समग्र शिक्षाच्या प्रकल्प अधिकारी डॉ. मनोरमा आवारी यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
एकाच पुस्तकात सर्व विषय
काही दिवसांपूर्वी शाळास्तरवरच पुस्तकांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यंदा जुनी पुस्तके वापरताच येणार नाहीत. यामुळे नवीन पुस्तके खरेदी करण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. त्यातही पुस्तकांच्या किंमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामानय
पुस्तकातच वही
पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांच्या पानांचाही समावेश करण्यात आला आहे. “माझी नोंद’ या शीर्षकाखाली ही पाने आहेत. या पानांचा वापर 21 प्रकारच्या नोंदी करण्यासाठी वापर करता येणार आहे.