माद्रीद- भारताची दोनवेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने बीडब्ल्युएफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. तीने पहिल्या फेरीच्या लढतीत स्लोव्हाकियाच्या मार्टीना रीपीस्कावर 21-7, 21-9 अशी सगळ दोन गेममध्ये विजय मिळवला.
पुरुषांच्या गटात भारताचा नवोदित गुणवान खेळाडू लक्ष्य सेनने जपानच्या केंटा निशीमोटोचा 22-20, 15-21, 21-18 असा तीन गेममध्ये पराभव केला. किदाम्बी श्रीकांतने चीनच्या ली शेई फेंगवर 15-21, 21-18, 21-17 अशी मात केली.
पुरुषांच्या दुहेरी गटात सात्विक साईराज रांकीरेड्डीने चिराग शेट्टीसह खेळताना तैपेयीच्या ली झे हुई व यांग पो हसोन या जोडीवर 27-25, 21-17 असा विजय मिळवला.
मिश्र दुहेरीत मात्र, सौरभ शर्मा व अनुष्का पारीख या जोडीला मलेशियाच्या तान किआन मेंग व ली पेई जींग जोडीकडून 21-8, 21-18 असा पराभव पत्करावा लागला.