सातारा – सातारा जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत होत असून निवडणुकांच्या तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या 98 कोटी रुपयांच्या अखर्चित निधीवरच जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे धुरंधर व्यासपीठावर असताना भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांना विरोधाची कमान सांभाळावी लागणार आहे.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बराच काळ लांबणीवर पडलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक मंगळवारी सकाळी 11 वाजता नियोजन भवनामध्ये होत आहे. राज्यात झालेल्या सत्तांतराची व महाविकास आघाडीविरूद्ध भाजप यांच्यातील राजकीय नाट्याची चुणूक नियोजन समितीच्या निमित्ताने दिसणार का, हा कळीचा मुद्दा आहे. बैठकीच्या निमित्ताने नवीन पालकमंत्री व नूतन जिल्हाधिकारी शेखर सिंह प्रथमच व्यासपीठावर आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दिवसभर महसूल, नियोजन, पुरवठा विभाग, सामान्य प्रशासन या विभागांच्या मॅरेथॉन बैठका घेत जिल्हा नियोजन आराखड्याची सविस्तर माहिती घेऊन त्यांची स्वतंत्र यादी बनवल्याची माहिती आहे. जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे व अतिरिक्त जिल्हाधिकारी आर. एस. शिंदे यांची स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती असून अखर्चित निधीवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. 2019-20 वार्षिक आराखडा 256 कोटीचा होता. त्यातील 158 कोटी रुपयांचा खर्च गेल्या दहा महिन्यांत झाला असून जिल्हा प्रशासनाला पुढील 70 दिवसांत 98 कोटी रुपये खर्च करण्याचे आव्हान आहे.
न पाहिल्याने खात्यातून रक्कम काढली जात असल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही.गेल्या दोन दिवसांपूर्वी श्री. माने कामकाजानिमित्त बॅंकेत गेले असता आपल्या बॅंक खात्यातून रक्कम कमी झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी संबंधितांकडे चौकशी केली असता खात्यातून वरचेवर रक्कम काढली गेली असल्याचे सांगितले.
तसेच बॅंक पासबुक छापून घेतल्यानंतर त्यामध्ये रक्कम काढल्याची नोंदही झाली. सौ. माने यांचे 43 हजार 304 रूपये काढण्यात आले आहेत. याबाबत श्री. माने पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून सायबर क्राईम विभागामार्फत चौकशी करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.