मुंबई – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस १३ चे विजेते सिद्धार्थ शुक्ला आज हृदयविकाराचा झटका निधन झाले आहे.मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे.
मिळलेल्या माहितीनुसार,अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपण्याच्या काही तासापूर्वी औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पुष्टी केली आहे.
दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने२००८ साली बाबुल आंगन का या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. लव यू जिंदगी, बालिका वधू व दिल से दिस तक में या मालिकेतून तो घराघरात प्रचलित झाला. त्याने झलक दिखला जा, फियर फॅक्टर खतरों के खिलाडी व बिग बॉस १३ या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे.
कलर्स या हिंदी वाहिनीवरील बिग बॉस 13 या शोमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची जोडी चांगलीच गाजली होती. या शोमध्ये दोघे एकमेकांची काळजी घेताना दिसले होते. त्यांची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. शो संपल्यानंतरही चाहते या दोघांना एकत्र पाहू इच्छित होते.