Shehnaaz Gill – बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल सर्वत्र चर्चेत आहे. ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. शहनाजने किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे.
View this post on Instagram
सध्या शहनाज तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. सोशलवर शहनाज गायक गुरु रंधावाला डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात आणि सोशल मीडियावर एकमेकांसोबतच्या पोस्टही शेअर करत असतात.
शहनाज गिल आणि गुरु रंधावा यांचा मूनराईज म्युझिक व्हिडिओ एकत्र आला होता जो लोकांना खूप आवडला होता. मूनराईजच्या यशानंतर गुरु आणि शहनाज पुन्हा एकदा एकत्र आले आहे. नुकतेच या जोडीने त्यांच्या गाण्याचे पोस्टर शेअर केले आहे. त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.
शहनाजने तिच्या आगामी सनराइज गाण्याचे पोस्टर शेअर केले. पोस्टर शेअर करताना तिने लिहिले,’हे फक्त एक गाणे नाही तर एक सुंदर भावना आहे जी आपण एकत्र जपतो. इतक्या प्रेमाबद्दल धन्यवाद… सूर्योदय नेहमी चंद्रोदयानंतर होतो.’
शहनाजची ही पोस्ट लगेच व्हायरल झाली. या दोघांच्या नात्याबद्दल चाहते बोलत आहेत. शहनाजच्या पोस्टवर चाहते खूप कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले,’तुला आणि गुरूला एकत्र पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.’ तर दुसर्याने लिहिले,’या अद्भुत जोडप्यासह नवीन वर्षाची उत्तम सुरुवात’
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शहनाज शेवटची भूमी पेडणेकरसोबत थँक यू फॉर कमिंग या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अनिल कपूर, कुशा कपिला, डॉली सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहे.