मुंबई – करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गर्दी टाळण्यासाठी सणसमारंभावर निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र असे असतना मनसेने दहीहंडी साजरी केली. भाजपने सुद्धा दहीहंडी वरुन आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. पहिली, दुसरी तिसरी लाट मुद्दाम आणली जात असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
करोनाचे नियम तोडून दहीहंडी उत्सव साजरा करुन काय मोठं स्वातंत्र्य मिळवलं नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. त्यावरुन मनसे नेते संदिव देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यावर टीका करत त्यांची तुलना थेट ब्रिटीश अधिकारी रँडशी केली आहे.
संदिप देशपांडे म्हणाले की, प्लेग ची साथ आहे या नावावर 1897 साली रँड ने जनतेवर भयानक अत्याचार केले. त्यावेळी चाफेकर बंधूनी त्याला धडा शिकवला होता. आत्ताच्या आधुनिक रँड ला येण्याऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल हे निश्चित. असे ट्विट त्यांनी केले आहे.