मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अमरावती जिल्ह्याच्या दोन दिवस दौऱ्यावर आहे. आज अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे डॉ अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी आयोजित सभेत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले,’ येत्या विधानसभा निवडणुकीत आमचे सरकार स्वबळावर येईल.आम्हाला युतीत कोणीही नको त्यांनी पुढे नाव न घेता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून सडकून टीका केली की,’नाव मोठं लक्षण खोटं… पाठीत खंजीर खुपसणारे नेते आहेत. आधी एकाच नेत्याचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. मात्र आता पाठीत खंजीर खुपसणारे म्हटल्यावर आणखी एक दुसरा चेहरा नजरेसमोर येतो, अशा शब्दांत पाटील मुख्यमंत्र्यांवर बरसले.
ते पुढे म्हणाले,’निवडणुकीत मोदींच्या नावाने निवडून येतात आणि मग सकाळी ब्रश करण्यापूर्वीच मोदींच्या नावावर टीका करत असतात. मोदी हे आमचे आई बाप आहेत. तुमच्या आई बापाला शिव्या दिलेलं तुम्हाला चालेल का, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.’