मुंबई – काल हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस देखील चांगलाच वादळी ठरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या भाषणांनी सभागृह दणाणून गेल्याचे दिसून आले. तत्पूर्वी काल शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सभागृहात केला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत एका महिन्यात चौकशी पूर्ण केली जाईल असे आश्वासन दिले.
मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष ठाकरे गटाचे विश्वासू आदेश बांदेकर आहेत. सरवणकर यांनी न्यासाच्या इतर सदस्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्री निधीला पाच कोटींचा चेक देणं हे अनियततेचं लक्षण आहे असं म्हणत न्यासाने यासाठी शासनाची परवानगी घेतली होती का ? असा सवाल उपस्थित केला. त्यासोबतच सरवणकर यांनी मंदिराने विकत घेतलेले पंधरा सोळा हजार तूप कोरोनाकाळात विकल्याचे देखील आरोप केला. त्यासोबतच मंदिरात सुरु करण्यात आलेल्या स्कॅन कोड प्रणालीसाठी साडे तीन कोटींचे कंत्राट ट्रस्टशी संबंधित व्यक्तींना देण्यात आले त्यासोबतच मंदिराच्या बुनर्बांधणी आणि दुरुस्तीच्या कामातही गैरव्यवहार झाल्याचे आरोप यावेळी केले.
Enquiry for alleged malpractices in Siddhivinayak Trust will be completed within 1 month.
सिद्धिविनायक न्यासाच्या कथित गैरकारभाराची चौकशी एका महिन्यात पूर्ण करणार.
चौकशीनंतर दोषींवर कारवाई करणार
(विधानसभा । दि. 30 डिसेंबर 2022)#WinterSession #Mumbai pic.twitter.com/JjCKm0W0qD— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 30, 2022
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत सभागृहात बोलताना म्हणाले,सदा सरवणकर यांनी न्यासाबाबत अनेक प्रश्न मांडले आहेत. याबाबत एक तक्रार देखील राज्य सरकारकडे आल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच यासंदर्भातील सर्व चौकशी एका महिन्यात पूर्ण करू असे आश्वासन देखील यावेळी फडणवीस यांनी यावेळी दिले. सिद्धिविनायक ट्रस्ट आणि आदेश बांदेकर यांची याबाबत नेमकी काय भूमिका आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.