मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची नुकतीच एंगेजमेंट झाली आहे. आणि लवकरच हे दोघे लग्न करणार आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी मुंबईत नाही तर राजस्थानमध्ये साखरपुद्याचा कार्यक्रम केला. नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिरात या जोडप्याचा साखरपुडा झाला आणि आनंदाच्या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत उपस्थित होते.
दरम्यान, साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर अंबानी यांच्या मुंबईतील अँटालिया निवस्थानात जोरदार सेलिब्रेशन झालं. यावेळी बॉलिवूडचे अनेक बडे कलाकार उपस्थित होते. अँटालिया येथे झालेल्या सेलिब्रेशनमध्ये प्रसिद्ध गायक मिका सिंह याने सुद्धा आपली हजेरी लावली असून, मिकाने यावेळी जबरदस्त परफॉर्म केला. त्याच्या परफॉर्मन्समुळे कार्यक्रामातील उत्साह वाढला. सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे.
मात्र, यासाठी मिका सिंहवर जबरदस्त पैशांची उधळण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहा मिनिटांसाठी मिका सिंहने तब्बल दीड कोटी रुपयांचं मानधान घेतल्याचं बोललं जात आहे. सध्या याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. मिका सिंह हा बॉलिवूड मधील प्रसिद्ध गायक असून, त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे.
View this post on Instagram