नवी दिल्ली : ज्ञानयोगाश्रम विजयपूरच्या सिद्धेश्वर स्वामीजी यांचं काल निधन झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने आज विजयपुरा येथील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
कर्नाटक सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने सिद्धेश्वर स्वामींचं अंतिम संस्कार राज्य सन्मानानं करण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
स्वामीजींच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींसह अन्य नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. पाच वर्षांपूर्वी पद्मश्री पुरस्कार नाकारल्यानंतर स्वामीजी प्रकाशझोतात आले होते. याबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून माहिती दिली होती.
ವಿಜಯಪುರದ ಜ್ಞಾನ ಯೋಗಾಶ್ರಮದ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಲಿಂಗೈಕ್ಯರಾದ ಸುದ್ದಿ ತಿಳಿದು ಅತ್ಯಂತ ದುಃಖವಾಗಿದೆ. ತಮ್ಮ ಪ್ರವಚನಗಳ ಮೂಲಕ ಮನುಕುಲದ ಉದ್ಧಾರಕ್ಕೆ ಶ್ರಮಿಸಿದ ಶ್ರೀಗಳ ಸೇವೆ ಅಮೋಘ ಹಾಗೂ ಅನನ್ಯವಾದುದು.
1/2 pic.twitter.com/WvNjQDmkJJ— Basavaraj S Bommai (@BSBommai) January 2, 2023
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही स्वामीजींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिलंय, ‘ज्ञानयोगाश्रम, विजयपूरचे संत श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झालं. ते आपल्या प्रवचनातून मानवजातीच्या उद्धारासाठी प्रयत्न करत असत. त्यांची सेवा उत्कृष्ट आणि अतुलनीय आहे. स्वामीजींचं जाणं ही कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो.
ಪರಮಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧೇಶ್ವರ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರು ಸಮಾಜಕ್ಕೆ ನೀಡಿರುವ ಗಣನೀಯ ಸೇವೆಗಾಗಿ ಅವರನ್ನು ಸ್ಮರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅವರು ಇತರರ ಒಳಿತಿಗಾಗಿ ಅವಿಶ್ರಾಂತವಾಗಿ ಶ್ರಮಿಸಿದ್ದರು ಮತ್ತು ಅವರ ಜ್ಞಾನೋತ್ಸಾಹಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಗೌರವಗಳಿಸಿದ್ದರು. ಈ ದುಃಖದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರ ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಕ್ತರೊಂದಿಗೆ ನನ್ನ ಸಂವೇದನೆ ಇದೆ. ಓಂ. ಶಾಂತಿ pic.twitter.com/7svVGEdSje
— Narendra Modi (@narendramodi) January 2, 2023
पीएम मोदींनी ट्विटमध्ये, ‘परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी त्यांच्या अतुलनीय सेवेसाठी स्मरणात राहतील. त्यांनी इतरांच्या भल्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि त्यांच्या विद्वत्तापूर्ण आवेशासाठीही त्यांचा आदर केला गेला. या दुःखाच्या प्रसंगी माझी भावना त्यांच्या असंख्य भक्तांसोबत आहे.’ असे म्हटले आहे.