नवी दिल्ली : केरळ सरकारमधील मंत्री आणि सीपीएम नेता एमबी राजेश यांनी आदी शंकराचार्यांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. आदी शंकराचार्य हे जुलमी जातव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते, असं ते म्हणाले.
सोमवारी तिरुवनंतपूरममधील शिवगीरी मठ येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
Adi Shankaracharya was advocate of a "cruel caste system", claims Kerala Minister
Read @ANI Story | https://t.co/XfVd6YjuH2#Kerala #AdiShankaracharya pic.twitter.com/4XxuSWoiv9
— ANI Digital (@ani_digital) January 3, 2023
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी वर्कला शिवगीरी मठ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “केरळमध्ये कोणी आचार्य असेल तर ते श्री नारायण गुरू आहेत, आदी शंकराचार्य नाही. शंकराचार्य हे मनुस्मृतीवर आधारीत जुलमी जातव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते. मात्र, नारायण गुरू यांनी आयुष्यभर जाती व्यवस्थेविरोधात लढा दिला.”
तसेच नारायण गुरू यांनी जाती व्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या शंकराचार्यांवर टीका सुद्धा केली होती, असेही ते म्हणाले.