Rashmika Mandanna । ‘हम लाख छुपाए प्यार मगर दुनिया को पता चल जाएगा…’ हे गाणं साऊथ अभिनेत्री रश्मीका मंदानाला बिलकुल फिट बसत, रश्मिका मंदानाच्या चित्रपटांप्रमाणेच तिची पर्सनल लाईफ चर्चेत असते.ती अभिनेता विजय देवरकोंडा सोबत रिलेशनमध्ये असल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात. मात्र या दोघांनीही या बातम्यांवर कधी रिएक्ट केले नाही. अशात सोशल मीडियावर नुकताच अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमुळे सध्या तिचे आणि विजयच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या आहे.
View this post on Instagram
वुमेंस डेला रश्मिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेयर केला. हा फोटो शेअर करत तिने सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. अशात शेअर केलेल्या फोटोतील पिंक टोपीने सर्वांचे लक्ष वेधले. फोटोत तिने ब्लू स्वेटशर्ट आणि ब्लैक पैंट सोबत पिंक कलरची क्यूट टोपी कॅरी केली होती. या टोपीवरून फॅन्सना विजयची आठवण आली.
या फोटोवर विजयचे नाव कंमनेट्स करत चाहत्यांनी तिची मज्जा घेतली आहे. मागच्या वर्षी विजयने त्यांच्या सोशल मीडियावर अशात पिंक रंगाची टोपी घातलेला फोटो शेअर केला होता. तर अशाच टोपीसह रश्मीकाचा फोटो दिसताच फॅन्स आता पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याची चर्चा करत आहे.अभिनेत्रीच्या या पोस्टवर कमेंट्सचा पूर आला होता. एका यूजरने लिहिले की, ‘ही टोपी विजय देवराकोंडाची आहे.’ दुसरा वापरकर्ता म्हणाला, ‘पिंक बीनी कॅप. फक्त व्हायरल गोष्टी…’
रश्मिका मंदान्नाच्या ( Rashmika Mandanna ) वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती तिच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पुष्पा 2’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांच्याशिवाय फहद फासिल, सुनील, प्रकाश राज, जगपती बाबू, अनुसया भारद्वाज या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी रश्मिकाने ‘पुष्पा 3’ संदर्भात एक मोठा इशारा दिला होता. ते म्हणाले होते, ‘ही अशी कथा आहे ज्याला अंत नाही. हे खूप मजेदार आहे.
हे वाचालं का ?
‘… तर मी पवारांच्या संमतीने भाजपमध्ये प्रवेश करील’ खडसेंचं सर्वात मोठं वक्तव्य