मुंबई – डॅशिंग अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि बोल्ड अभिनेत्री दिशा पटनी ‘योद्धा’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा अॅक्शन चित्रपट चित्रपट असून सिद्धार्थ आणि दिशा या चित्रपटात अॅक्शन स्टंट करतांना दिसणार आहे. या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत अपडेट समोर येत आहे. ‘योद्धा’ चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. धर्मा प्रोडक्शनने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. आता हा चित्रपट याच वर्षी १५ डिसेंबरला रिलीज होणार आहे.
सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत आहे. धर्मा प्रोडक्शन यांनी माहिती दिली रिलीजच्या तारखेचे वर्णन करताना, धर्मा प्रॉडक्शनने कॅप्शनमध्ये लिहिले,’या फ्रँचायझीचा पहिला अॅक्शन चित्रपट, योद्धा उडण्यासाठी तयार आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित हा चित्रपट १५ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
या चित्रपटाची आतापर्यंत तिसऱ्यांदा रिलीज डेट बदलल्यामुळे सिद्धार्थ मल्होत्रा नाराज असल्याच्याही चर्चा सोशल मीडियावर काही दिवसांपासून आहे, रिलीज डेटवरून सिद्धार्थ म्हणाला होता,’मी योद्धा लवकरात लवकर त्याच्यापर्यंत पोहोचण्याची वाट पाहत आहे.’ या चित्रपटाव्यतिरिक्त, सिद्धार्थ लवकरच इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे.