सातारा – ऍमेच्युअर ऍक्वॅटिक असोसिएशनच्यावतीने गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत साबळेवाडी, ता. सातारा येथील जान्हवी भरत कडव व विराज या बहीण-भावाने यश मिळविले.
जान्हवीने दोन किमी तर लहान मुलांच्या गटात विराजने एक किमी अंतराच्या
स्पर्धेत यश मिळविले. या दोघांनी अनेक सागरी जलतरण स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. त्यांना आई-वडील व प्रशिक्षक नितीन गुजर यांचे मार्गदर्शन लाभले. माजी खासदार उदयनराजे भोसले, सुनील काटकर, ऍड. दत्तात्रय बनकर, सौ. पार्वती कडव, सरपंच सौ. सुषमा जाधव, उपसरपंच विनायक कडव, ग्रामसेवक युवराज साळुंखे, शिक्षक चंद्रकांत कडव, हणमंत पवार, धर्माजी बाबर, लक्ष्मण कडव व शिक्षकांनी दोघांचे अभिनंदन केले.