श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी घडविले माणुसकीचे दर्शन

अकोले  -गरजू, गरीब परप्रांतीयांना व प्रशासन व्यवस्थेत आपले कर्तव्य बजावणाऱ्या बाहेरील गावच्या पोलिसांना जेवणाची व्यवस्था करून येथील स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी माणूसकीचे दर्शन घडविले. केंद्राचे प्रतिनिधी संजय हुजबंद यांच्या पुढाकाराने हा उपक्रम अकोले येथे राबवला जात आहे.

गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या सूचनेनुसार करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ठिकठिकाणी समाज हितासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजूर, कारागीरांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यांच्या दररोजच्या जेवणाचा प्रश्न उभा राहिला आहे. तसेच प्रशासन नागरिकांच्या हितासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन यशस्वी व्हावा, म्हणून दिवस-रात्र ड्यूटीवर घरापासून लांब, दुसऱ्या गावात आपले कर्तव्य बजावीत आहे.

या सर्व बाबींचा विचार करून अकोले येथील पाटीलगल्लीमधील श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. कालपासून त्याची सुरुवात केली असून, नाईकवाडी वाड्यात राहात असलेल्या 10 परप्रांतीयासाठी आठ दिवसांचा किराणा, भाजीपाला, पीठ त्यांच्या घरी नेऊन दिले आहे. तसेच महात्मा फुले चौकात संगमनेर येथून आलेल्या पाच पोलिसांसाठी जेवणाचे डबे दिले.

माणूस हीच एक जात, माणुसकी हाच एक धर्म प पू गुरुमाऊली व चंद्रकांत दादा यांची ही शिकवण सेवेकरी जोपासत आहेत.गुरूपिठावर असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.