प्रिंस हॅरी दाम्पत्याच्या सुरक्षेचा खर्च आम्ही करणार नाही – ट्रम्प

लंडन – ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिंस हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन हे जर भविष्यात अमेरिकतच कायमचे राहायला आले तर त्यांच्या सुरक्षेचा खर्च आम्ही करणार नाही त्यांचा हा खर्च त्यांनीच सोसला पाहिजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

हे दाम्पत्य सध्या कॅलिफोर्नियात राहायला आले आहे. ब्रिटिश राजघराण्याचा मी एक चांगला मित्र आणि समर्थक आहे. त्या घराण्यातील प्रिंस हॅरी आणि मेघेन हे कॅनडात कायमचे स्थायिक होण्यासाठी ब्रिटनहून निघाल्याचे मला समजले. पण आता ते कॅनडातून अमेरिकेत आले आहेत. तथापि त्यांच्या सुरक्षेचा खर्च अमेरिका सोसणार नाही असे ट्रम्प यांनी एका ट्विटर संदेशात नमूद केले आहे.

प्रिंस हॅरी हे ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आहेत. त्यांनी अमेरिकेच्या एका अभिनेत्रीशी विवाह केला आहे. या दाम्पत्याविषयी माध्यमांमध्ये मोठे आकर्षण असल्याने त्याचा रोज त्रास होऊ नये म्हणून या दाम्पत्याने ब्रिटन सोडले आहे. त्यानंतर हे दाम्पत्य कॅनडाच्या व्हॅंकुवर बेटावर राहात होते. पण त्यांनी आता आपला राजघराण्याशी असलेला संबंध तोडला असल्याने आम्ही त्यांच्या सुरक्षेवर खर्च करणार नाही असे कॅनडा सरकारने गेल्याच महिन्यात घोषित केले होते. आता हे दाम्पत्य अमेरिकेत मेघन हिच्या माहेरच्या घरी म्हणजे लॉस एजंल्सला राहायला आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनी त्यांच्या सुरक्षेचा खर्च त्यांचा त्यांनी करावा असे म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.