मुख्यमंत्र्यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर   : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सकाळी करवीरनिवासीनी श्री अंबाबाई देवीच दर्शन घेतले. यावेळी खासदार धैर्यशील माने, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, माजी खासदार निवेदिता माने आदी यावेळी उपस्थित होते.

यानंतर उजळाईवाडी येथील विमान तळावरून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचे पुण्याकडे प्रयाण झाले. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, आमदार प्रकाश आबिटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, माजी आमदार सुजित मिणचेकर, सुरेश साळोखे आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.