Girish Mahajan – राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर 137 कोटी रुपयांची नोटीस आल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचे (heart attack) सोंग केल्याचा आरोप केला आहे. त्यांना असा कोणता हृदयविकाराचा झटका आला.
खोटी सोंगं करायची. उपचार घ्यायचे आणि पुन्हा इकडे परत येऊन आमच्यावर आरोप करायचे, असे ते म्हणाले आहेत. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. (heart attack)
त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने तातडीने हवाई रुग्णवाहिकेने जळगावहून मुंबईला हलवण्यात आले होते. तिथे उपचार घेतल्यानंतर त्यांनी परवा गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
महाजन पुढे म्हणाले, एकनाथ खडसेंना स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्याचे सांगा. सर्व प्रश्न आपोआप सुटतील. 137 कोटींची नोटीस आल्यानंतर सोंग करायचे. काही झाले नसताना दवाखान्यात जाऊन बसायचे.
केवळ नोटीस आल्यामुळे त्यांनी कोर्टाची सहानुभूती मिळवण्यासाठी आजारापणाचे नाटक केले. त्यांना असा कोणता हृदयविकाराचा झटका आला? खोटी सोंगं करायची. उपचार घ्यायचे आणि परत इकडे येऊन आरोप करायचे. याला काय म्हणावे? त्यापेक्षा त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी.
म्हणूनच त्यांची हकालपट्टी-खडसे
वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना गिरीश महाजन यांनी गायनॅक विभागाकडे (प्रसूतीशास्त्र) जास्त लक्ष दिले. ह्रदयरोग विभागाकडे त्यांचे कमी लक्ष होते. वैद्यकीय शिक्षण विभागात त्यांनी जे चाळे केले,
त्यामुळे त्यांची या खात्यातून हकालपट्टी झाली, अशा शब्दात आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री महाजन यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. आजाराची खात्री करायची असेल तर त्यांचे सर्व कागदपत्रे तपासण्याचेही आव्हान दिले आहे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.