India vs Australia 1st T20 Match Toss Update Visakhapatnam : ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला पराभूत केलं. टीम इंडियाने वर्ल्ड कपमधील सलग 10 सामने जिंकले. मात्र एक सामना गमावला आणि वर्ल्ड कप ट्रॉफीचं स्वप्न भंग झालं. आता टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून (23 नोव्हेंबर) 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव याला भारतीय क्रिकेट संघांचं कर्णधारपद देण्यात आलं आहे तर मॅथ्यू वेड हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे.
उभय संघांमधील पहिला सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यास 7 वाजता सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी, भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (India won the toss and elected to field) ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजी करेल. सूर्यकुमारने सांगितले की, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा आणि आवेश खान यांना सामन्यात संधी देण्यात आलेली नाही.
🚨 Toss Update 🚨
Suryakumar Yadav – on his captaincy debut in international cricket – has won the toss & #TeamIndia have elected to bowl against Australia in the first #INDvAUS T20I.
Follow the match ▶️ https://t.co/T64UnGwKUm @idfc pic.twitter.com/IDej4ADBZK
— BCCI (@BCCI) November 23, 2023
दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 26 टी-20 सामने खेळवण्यात आले आहेत. या 26 सामन्यांमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियावर सरस ठरली आहे. भारतीय क्रिकेट संघाने कांगारुंचा 15 सामन्यांमध्ये पराभव केला आहे तर ऑस्ट्रेलियाला केवळ 10 सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर एकमेव सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अलीकडेच भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ (WC2023) आमनेसामने आले. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला. त्याच वेळी, भारतीय संघ तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक चॅम्पियन होण्यास मुकला.