नवी दिल्ली – वैयक्तिक गटासह आता भारताच्या नवोदित नेमबाजांनी आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत सांघिक गटातही सरस कामगिरी केली आहे. मिश्र गटात सुवर्णपदक पटकावत वर्चस्व राखलेल्या अर्जुन बबुताने शाहू तुषार माने व पार्थ मखिजा यांच्यासह सांघिक गटात 10 मिटर एअर पिस्तूल प्रकारातही भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
सुवर्णपदकासाठी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने कोरियावर 17-15 असा रोमहर्षक विजय मिळवला. कोरिया संघात सेउंग होऊ बॅंग, सॅंगडो किम व हाजून पार्क या जागतिक मानांकन क्रमवारीतील खेळाडूंचा सहभाग होता. तरीही भारतीय खेळाडूंनी त्यांच्यावर मात केली.
#TeamIndia🇮🇳 On A Medal Rush 🔥🔥
Our young shooters begin their day with 2️⃣ medals at the ongoing @ISSF_Shooting 2022 World Cup, Changwon
🥇10m Air Rifle Men’s Team @Paarthmakhija26 @arjunbabuta #TusharMane
🥈10m Air Rifle Women’s Team @elavalarivan @GhoshMehuli #Ramita pic.twitter.com/zcl7yf5xzS
— SAI Media (@Media_SAI) July 14, 2022
महिलांच्या सांघिक गटात एलेवेनिल वेलारीवेन, मिश्र गटातील सुवर्णपदक विजेती मेहुली घोष व रमिता यांना रजतपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत आतापर्यंत भारताने 3 सुवर्ण, 4 रजत व 1 ब्रॉंझ अशी एकूण 8 पदके मिळवताना पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे.