भोपाळ – राष्ट्रपती निवडणुकीतील विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी गुरूवारी भाजपवर आरोपांची सरबत्ती केली. राष्ट्रपती निवडणुकीतही भाजपचे ऑपरेशन कमळ सुरू आहे. भाजपेतर पक्षांच्या आमदारांना मोठ्या रकमांची ऑफर दिली जात आहे. संबंधित प्रकरणी निवडणूक आयोगाने चौकशी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
मध्यप्रदेशातील कॉंग्रेस आमदारांची भेट घेतल्यानंतर सिन्हा येथे पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रपती निवडणुकीत आपल्या उमेदवाराला मतदान करावे यासाठी भाजपेतर पक्षांच्या आमदारांना पैशांचे आमीष दाखवले जात असल्याची माहिती मला मिळाली.
न्याय्य आणि मुक्त वातावरणातील निवडणुकीची भाजपला भीती वाटत असल्याचे दिसते. त्यामुळे विविध राज्यांची सरकारे पाडण्यासाठी भाजपकडून केले जाणारे ऑपरेशन कमळ राष्ट्रपती निवडणुकीतीही सुरू असल्याचे दिसते, असा आरोप त्यांनी केला.
अनिल परबांच्या साई रिसॉर्टवर केंद्रीय पथक चौकशीसाठी दाखल
कमळ हे भाजपचे निवडणूक चिन्ह आहे. त्याचा आधार घेऊन विरोधक भाजपवर राज्यांची सत्ता मिळवण्यासाठी ऑपरेशन कमळ राबवत असल्याचा आरोप करतात. राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. ती निवडणूक 18 जुलैला होणार आहे.
मानवी तस्करी प्रकरणात गायक दलेर मेहंदीला दोन वर्षांची शिक्षा कायम