मुंबई – तेलुगु चित्रपटातील सुपरस्टार अभिनेत्री तमन्ना भाटिया ही मूळ पंजाबी आहे. मात्र ती अभिनेत्री म्हणून तेलुगु व तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. अनेकांना असे वाटते, की तमन्ना साउथमधून उत्तर भारतीय चित्रपट उद्योगाकडे वळली, परंतु तिने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘चांद सा रोशन चेहरा’ या हिंदी चित्रपटाद्वारे केली. 2005 मध्ये तमन्ना भाटिया ही अभिजित सावंतच्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.
2006 मध्ये तिने ‘श्री” या तेलुगु चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. माधुरी दीक्षितला तमन्ना आपला आदर्श मानते. मात्र गेल्या काही कला पासून तमन्ना बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली नाही. पण ती लवकरच नवीन चित्रपट घेवुन येत आहे. तमन्नाने मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘बबली बाऊन्सर’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटाबाबत अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या पण आता तमन्ना आणि मधुर भांडारकर ही जोडी एका प्रोजेक्टवर एकत्र काम करत असल्याची निश्चित झाले आहे.