दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत अभिनेत्री तमन्ना भाटियाने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निरमा केल आहे. सध्या तमन्ना ओटीटीवर सुद्धा धुमाकूळ घालत आहे. अशात ती पुन्हा एकदा साऊथ सुपरस्टार महेश बाबू सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मोस्ट अवेटेड चित्रपट गुंटूर करम नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशात, महेश बाबू आणि तमन्ना भाटिया एका सेटवर स्पॉट झाले आहेत.
तमन्ना आणि महेश एकत्र दिसणार का?
अलीकडेच पॅन इंडिया स्टार्स तमन्ना भाटिया आणि महेश बाबू एका सेटवर स्पॉट झाले. या दोघांचा फोटोही समोर आलाय, ज्यामध्ये महेश बाबू आणि तमन्ना भाटिया एकमेकांशी बोलताना दिसत आहे. यावेळी अभिनेता निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि राखाडी पँटमध्ये दिसत आहे. त्यामुळे प्रिंटेड टॉप आणि ब्लू डेनिममध्ये अभिनेत्री खूपच क्यूट दिसत आहे.हा फोटो कुठल्यातरी सेटमधला आहे, आता तमन्ना आणि महेश बाबू कोणत्या चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत? असा चाहत्यांकडून प्रश्न विचारला जात आहे.

चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडते. तमन्ना आणि महेश बाबू जेव्हा-जेव्हा एकत्र येतात तेव्हा दोघांनीही पडद्यावर आपली जादू पसरवली आहे. दोघांची केमिस्ट्रीही चांगली आहे. तमन्नाने महेश बाबूसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण आता हा फोटो पाहून चाहते त्याच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी उत्सुक झाले आहेत.