मुंबई – छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे जय मल्हार. पौराणिक कथेवर आधारित असलेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली होती.या मालिकेत देवदत्त नागे, सुरभी हांडे आणि ईशा केसकर या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.ही मालिका संपून अनेक दिवस उलटले आहेत. परंतु, त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही.
View this post on Instagram
मालिकेत सुरभी हांडे हिने म्हाळसा देवी ही भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती. आणि याच व्यक्तिरेखेमुळे सुरभी प्रेक्षकांच्या मनावर अजून ही अधिराज्य गाजवत आहे. दरम्यान, जय मल्हार मालिकेनंतर सुरभी ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत झळकली. तसंच ‘अग्गं बाई अरेच्चा 2’ या चित्रपटातही झळकली होती.
View this post on Instagram
दरम्यान, मालिकेत खंडेरायाची अर्धांगिनी ही भूमिका साकारणारी सुरभी हांडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत असते. नुकतंच सुरभीने एक दमदार फोटोशूट केले असून, या मध्ये तिचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे.
View this post on Instagram
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सुरभीने निळ्या रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला असून, यामध्ये तिचे सौंदर्य अजूनच खुलून आले आहे. सुरभीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. निळ्या रंगाच्या या ग्लॅमर्स ड्रेसमध्ये सुरभी हांडे वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. सोशल मीडियावर सुरभीच्या फोटोंनी सध्या अनेकांचे लक्ष वेधलं आहे.