मुंबई – बॉलीवूड अभिनेता ‘अक्षय कुमार’ हा फिल्म इंडस्ट्रीतील एका वर्षात सर्वाधिक चित्रपट करणारा अभिनेता आहे. हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्स मासिकाच्या सर्वाधिक कमाईच्या यादीवरून दिसून येते.
Alone we can do so little, together we can do so much. Its teamwork and I am grateful to each and every member of the cast and crew. #BellBottomCompleted. Here’s the poster
.@Vaaniofficial @humasqureshi @LaraDutta @vashubhagnani @ranjit_tiwari @jackkybhagnani @honeybhagnani pic.twitter.com/Wyf08FMcen— Akshay Kumar (@akshaykumar) October 1, 2020
या यादीत स्थान मिळविलेला अक्षय हा एकमेव भारतीय अभिनेता आहे. तथापि, करोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनने सध्या त्याच्या चित्रपटांचे प्रदर्शन आणि शूटिंग बंद होते, मात्र बेल बॉटम’च्या निर्मात्यांनी मात्र चित्रीकरण सुरु ठेवलं आणि लॉकडाउनमध्येच संपूर्ण चित्रपट तयार केला.
#BellBottom Fanmania : Some Amazing Fanmade Posters Made By Fans 👌😍 . Excitement Is On Top For This Movie 🎥
Check Them Out ♥ @akshaykumar @Vaaniofficial @humasqureshi @LaraDutta @vashubhagnani @ranjit_tiwari @jackkybhagnani @honeybhagnani #BellBottomcompleted pic.twitter.com/pry89v4yVL— Bhushan Khiladi (@Bhushanadhau1) October 1, 2020
लॉकडाउननंतर विदेशात शूट होणारा ‘बेल बॉटम’ हा पहिला चित्रपट ठरला आहे . येत्या २ एप्रिल २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शूटिंग पूर्ण होताच हे टीमवर्क आहे असं म्हणत या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
या चित्रपटात लारा दत्ता, वाणी कपूर, हुमा कुरैशी या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत.प्रोड्यूसर जैकी भगनानी तर दिग्दर्शक रंजित तिवारी आहेत.