“हिला हाकलणे आणि मी ट्विटरवर येणे याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही’, सुव्रत जोशीची ‘ती’ पोस्ट व्हायरल…

'या' पोस्टमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा उल्लेख केला

मुंबई –   बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि वाद हे आता एक समीकरणच बनलं आहे. आताही अशाच एका घटनेवरून कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद  केले आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कंगनाने काही वादग्रस्त ट्वीट केले होते. त्यानंतर माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने कंगनावर कारवाई कराताना तिचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sula (@suvratjoshi)

दरम्यान, कंगनाचे ट्विटवर अकाउंट बंद होताच मराठी चित्रपटसृष्टीतला अभिनेता सुव्रत जोशी सोशल मीडियावर सक्रीय झाला आहे. सध्या सुव्रत जोशीची एक पोस्ट सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष देधून घेत आहे. त्याने या पोस्टमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा उल्लेख केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sula (@suvratjoshi)

खरेतर सुव्रत जोशीनेट्विटरवर काल (दि. ४) त्याचे अकाउंट सुरू केले. त्याने हे चाहत्यांना सांगताना कंगना राणावतचा उल्लेख त्याच्या पोस्टमध्ये केला आहे. त्याने लिहिले की… “आईची शप्पथ… हिला हाकलणे आणि मी ट्विटरवर येणे याचा एकमेकांशी काहीही संबंध नाहीये! मी तिची जागा घेऊ इच्छित नाही आणि ती उडवते तसे ज्ञानशिंतोडे उडवायची माझ्या मेंदूची क्षमताही नाही. तर माझी टिव्हटीव्ह तिथेही सुरू करतोय… फॉलो करा! या आशयाची पोस्ट सुव्रत जोशीने केली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.