विद्युत जामवालच्या ‘खुदाहाफीज’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात

मुंबई – अभिनेता विद्युत जामवालने त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीची सुरूवात केली आहे. विद्युत त्याच्या अॅक्शन सीन्ससाठी प्रसिद्ध आहे. मात्र, आता तो लवकरच रोमॅन्टिक चित्रपटामध्ये झळकणार आहे. दिग्दर्शक फारुख कबीर यांच्या आगामी ‘खुदाहाफीज’ या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटींगला उझबेकीस्तानमध्ये सुरूवात झाली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करून याची माहिती देण्यात आली आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अधिकृत माहिती दिली आहे. दरम्यान, पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘खुदाहाफीज’ या चित्रपटाची अलिकडेच घोषणा करण्यात आली होती. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा असेल. या चित्रपटात अॅक्शन सीनदेखील असणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील टीम या अॅक्शन सीन्सला कोरियोग्राफ करतील. चित्रपटात विद्युतसोबत कोणती अभिनेत्री झळकणार, याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.